11 मंग पेत्रले समजनं की काय घडनं अनी तो बोलना, “आते माले खरच कळनं की, प्रभुनी आपला दूत धाडीसन माले हेरोद राजाना हाततीन अनी यहूदी लोके जी वाट दखी राहींतात त्यापाईन माले सोडायेल शे.”
12 त्याले हाई समजनं तवय तो मार्क म्हणेत तो योहान, यानी माय मरीया हिना घरजोडे वना, तठे बराच लोके एकत्र व्हईसन प्रार्थना करी राहींतात. 13 पेत्र बाहेरना दरवाजानी कडी ठोकी राहींता तवय एक दासी पोर जीनं नाव रूदा व्हतं ती दार उघडाकरता वनी. 14 तिनी पेत्रना आवाज वळखा पण खूशीमा दरवाजा नही उघडताच पयत मझार जाईन सांगु लागनी की, “पेत्र दरवाजाजोडे उभा राहेल शे.” 15 त्यासनी तिले सांगं, “तु येडी व्हयनी शे का!” तरी ती खात्रीतिन सांगु लागनी की हाई खरच शे; त्या बोलनात, “तो त्याना देवदूत व्हई.”
16 मंग पेत्र ठोकतच राहीना तवय त्यासनी दरवाजा उघडा अनी त्याले दखीन त्या थक्क व्हयनात. 17 तवय त्यानी त्यासले गप्प राहा असा हातवरी इशारा करा, अनी माले प्रभुनी कैदखानामातीन कसं काढं हाई त्यानी त्यासले सविस्तर सांगं, अनी सांगं की, “हाई याकोब अनी सर्व बंधुसले सांगा,” नंतर तो दुसरीकडे निंघी गया.
18 मंग दिन उगायना तवय पेत्रनं काय व्हयनं, अशी शिपाईसमा मोठी गडबड व्हयनी. 19 हेरोदनी त्याले शोधाना आदेश दिधा, पण पेत्र सापडना नही; म्हणीसन त्यानी पहारेकरीसनी चौकशी करीसन त्यासले मारी टाकानी आज्ञा दिधी.
21 मंग ठरायेल दिनले हेरोद राजा राजकीय कपडा घालीसन राजासनवर बठना अनी जमेल लोकसले भाषण देवु लागना. 22 तवय लोके वरडीन बोलु लागनात, “हाई मनुष्यवाणी नही शे, देववाणी शे.” 23 तीच येळले प्रभुना दूतनी हेरोदले मारी टाकं, कारण त्यानी देवले मान दिधा नही, त्याना आंगमा किडा पडीन तो मरना.
24 पण देवनं वचन वाढतच गयं अनी पसरत गयं.
25 बर्णबा अनी शौल ह्या आपला कामे पुरा करीसन आपलासंगे योहान ज्याले मार्क म्हणेत त्याले लिसन यरूशलेमतीन परत माघारे अंत्युखियाले वनात.
<- प्रेषित 11प्रेषित 13 ->
Languages