Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 126
प्रवाशांचे आराधना गीत.
1 जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले[a],
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
2 आमचे मुख हास्याने भरले होते
आणि किती हर्षगीते आम्ही गाईली!
तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली:
“पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
3 याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत,
आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
 
4 हे याहवेह, नेगेव नदीसारखी,
आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या[b].
5 जे अश्रूंनी पेरणी करतात,
ते आनंदाने कापणी करतील.
6 जे रडत पेरणीसाठी
बी घेऊन जातात,
ते आपल्या पेंढ्या घेऊन,
आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

<- स्तोत्रसंहिता 125स्तोत्रसंहिता 127 ->