Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 125
प्रवाशांचे आराधना गीत.
1 ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत,
कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
2 यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात,
तसेच आता आणि सदासर्वकाळ,
याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
 
3 नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर
दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही,
नाहीतर नीतिमान लोकही
त्यांच्या हाताने दुष्टता करतील.
 
4 हे याहवेह, जे नीतिमान आहेत,
ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.
5 परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात,
त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील.
 
इस्राएलावर शांती असो.

<- स्तोत्रसंहिता 124स्तोत्रसंहिता 126 ->