4 लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला: 5 “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. 6 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. 7 काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली. 8 काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.”
9 त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?” 10 तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की,
11 “या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे. 12 पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही. 13 खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात. 14 काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत; 15 काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.
21 तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”
24 तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.”
30 येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”
32 जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. 33 दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो संपूर्ण कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला.
34 डुकरांचे कळप राखणार्यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. 35 तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तिथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. 36 प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकरांच्या चहूकडील प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारी जाण्यास निघाले.
38 ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, 39 “आपल्या घरी परत जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे काही केले आहे ते त्यांना सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले.
45 तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?”
46 परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.”
47 मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले. 48 येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”
49 येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”
50 हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.”
51 याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही. 52 ते घर शोक करणार्या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”
53 तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. 54 मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” 55 त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.” 56 तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.”
<- लूक 7लूक 9 ->
Languages