9 येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलींमध्ये सुद्धा दिसून आला नाही.” 10 त्या अधिकार्याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला.
14 नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!” 15 तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
16 हे पाहून सर्व लोक भयचकित झाले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “आम्हामध्ये एक थोर संदेष्टा उदय पावला आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या साहाय्यासाठी आले आहेत.” 17 येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.
20 ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्या कोणाची वाट पाहावी?”
21 त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली. 22 तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. 23 जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
24 योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्याच्या झोताने हलणार्या लव्हाळ्याला काय? 25 जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात. 26 परंतु तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक. 27 हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे:
29 जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते. 30 तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नाही.
31 येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?” 32 लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारात बसून इतरांना हाक मारतात:
39 ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”
40 येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.”
41 तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी[c] आणि दुसर्याला चांदीची पन्नास नाणी. 42 परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?”
43 “ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले.
44 नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले. 45 तू मला चुंबन[d] दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही. 46 तू माझ्या डोक्यावर तेल लावले नाहीस, परंतु हिने तर माझ्या पायांवर सुगंधी अत्तर ओतून दिले आहे. 47 यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.”
48 येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.”
49 त्या ठिकाणी आलेल्या दुसर्या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?”
50 येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”
<- लूक 6लूक 8 ->
Languages