3 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे. 4 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या[a] हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल. 5 तो राजा सिद्कीयाहला खास्द्यांच्या येथे नेईल व मी येऊन तुझी भेट घेईपर्यंत तो तिथेच राहील, असे याहवेह जाहीर करतात. जर तू बाबेलांशी युद्ध केलेस तरी तुला विजय मिळणार नाही.’ ”
6 यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे: 7 शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’
8 “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’
13 “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या: 14 ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव. 15 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’
16 “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.
26 नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले: 27 “मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का? 28 म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल. 29 हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.
30 “त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात. 31 हे शहर बांधले त्या दिवसापासून आतापर्यंत या शहराने माझा क्रोध व संताप इतका भडकविला आहे की या शहराला मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकणार आहे. 32 इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे. 33 त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही. 34 माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे. 35 बेन हिन्नोम खोर्यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.
36 “या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: 37 परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील. 38 मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. 39 मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल. 40 मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत. 41 त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन.
42 “याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन. 43 या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल. 44 बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी[c] निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”
<- यिर्मयाह 31यिर्मयाह 33 ->
Languages