5 अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली. 6 परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले.
7 अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला. 8 मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला. 9 त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले, 10 हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला.
21 इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली. 22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली.
23 याहवेहने तिला सांगितले,
24 तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले. 25 पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव[b] असे ठेवले. 26 मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब[c] असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
27 हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे. 28 इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
29 एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला. 30 तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम[d] असेही म्हणतात.)
31 याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”
32 एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”
33 परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
34 तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला.
Languages