3 मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.” 4 मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले.
8 मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”
9 मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले. 10 आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते. 11 परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.
12 मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”
13 मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला. 14 तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.”
15 जेव्हा मोशे पर्वतावर गेला, मेघांनी पर्वत झाकून गेले, 16 आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला. 17 इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्या अग्नीप्रमाणे दिसले. 18 मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.
<- निर्गम 23निर्गम 25 ->
Languages