2 “दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका, 3 आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.
4 “तुमच्या वैर्याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे. 5 जे तुमचा द्वेष करतात त्यांचे गाढव ओझ्याखाली पडलेले तुम्हाला दिसले, ते तसेच सोडू नये; त्यांना अवश्य मदत करावी.
6 “तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये. 7 खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही.
8 “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
9 “परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
12 “सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.
13 “जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये.
15 “बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला.
16 “जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात पेरलेल्या पिकाचा हंगाम करता, तेव्हा त्याच्या प्रथमफळाने हंगामाचा सण पाळावा.
17 “वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह यांच्यासमोर हजर व्हावे.
18 “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये.
19 “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा.
27 “तुम्ही जो देश जिंकून घ्याल त्यात मी आपले भय पाठवेन व त्यात गोंधळ निर्माण करेन. तुमचे शत्रू पाठ दाखवून पळ काढतील असे मी करेन. 28 हिव्वी, कनानी, हिथी या लोकांनी तुमच्या मार्गातून बाजूला व्हावे म्हणून मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवेन. 29 पण एका वर्षातच मी त्यांना घालवून देणार नाही, कारण देश ओसाड होईल आणि वनपशू तुमच्यासाठी पुष्कळ होतील. 30 तुमची संख्या वाढून तुम्ही त्या देशाचा ताबा घेईपर्यंत थोडेथोडे असे मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देईन.
31 “तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत[a] व वाळवंटापासून फरात[b] नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल. 32 त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये. 33 त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.”
<- निर्गम 22निर्गम 24 ->
Languages