6 तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का? 7 या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले. 8 आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.
9 तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते. 10 जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल. 11 मी तुम्हाला लिहित आहे की आपण बंधू किंवा भगिनी आहोत असा दावा करीत असतानाही जे जारकर्म किंवा लोभी, निंदक, मूर्तिपूजक, मद्य प्राशन करणारे आहेत अशांमध्ये मिसळू नका. अशा लोकांबरोबर भोजनास देखील बसू नका.
12 मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का? 13 बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”[a]
<- 1 करिंथकरांस 41 करिंथकरांस 6 ->- a अनु 13:5; 17:7; 19:19; 21:21; 22:21, 24; 24:7
Languages