6 आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये. 7 तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता?
8 इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहात, आम्हाला सोडून राज्य करीत आहात; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो. 9 मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे. 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख आहोत, ख्रिस्तामध्ये तुम्ही सर्व सुज्ञ आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही सशक्त आहात! आम्ही अप्रतिष्ठित आहोत, तुम्ही तर प्रतिष्ठित आहात! 11 या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तहानलेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत. 12 आम्ही आमच्या हाताने काबाडकष्ट करतो, जेव्हा आम्हाला शाप देतात, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ केला जातो, तेव्हा आम्ही सहन करतो; 13 आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत.
18 मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत. 19 परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन. 20 परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे. 21 तुम्हाला काय आवडेल, मी तुम्हाकडे शिस्तीची काठी घेऊन, की प्रेम भावाने आणि सौम्य आत्म्याने यावे?
<- 1 करिंथकरांस 31 करिंथकरांस 5 ->
Languages