1 यामुये आपण ख्रिस्तबद्दलन्या सुरवातन्या गोष्टी सोडीसन सिध्दांतसकडे जावाना प्रयत्न करूत. मरेलकडे लई जाणारा कामसपाईन मनले फिरावानं, देववर ईश्वास ठेवानं, 2 अनी बाप्तिस्मानी शिक्षा देनं, हात ठेवानं, मरेलसनं पुनरूत्थाननं अनी सार्वकालिक न्यायनं शिक्षण हाऊ पाया आपण परत घालाले नको. 3 देव व्हवु दि, तर हाई आपण करूत. 4 ज्या लोकं आपला ईश्वासमा भटकी गयात त्यासले परत पश्चताप कराकरता कशं लयता ई? कारण ज्या लोकसले एकदाव प्रकाश भेटी गया, ज्यासनी स्वर्गीय दाननी चव लिधी, ज्या पवित्र आत्माना भागीदार व्हयनात, 5 अनी ज्यासनी देवना सुवचनसनी अनं येणारा युगना सामर्थ्यना अनुभव लेयल शे, 6 त्या जर ईश्वासमा भटकी गयात, तर त्यासले पश्चाताप करता परत नवं बनाडानं हाई अशक्य शे, कारण हाई त्यासनं भटकनं म्हणजे त्यासनी देवना पोऱ्याले परत क्रुसखांबवर खियानं अनी त्याना उघड अपमान करनं अस शे.
7 कारण जी “भुमी” आपलावर घडीघडी पडेल पाऊस पिसन आपली लागवड करणारसकरता उपयोगी अशी “भाजीपाला” उगाडस, तिले देवना आशिर्वाद भेटस. 8 अनी जी भुमि काटेरी झाडं अनं झुडपं उगाडस, ती टाकाऊ अनी शापीत व्हवानी वाटवर लागेल शे. तिना शेवट जळनं हाई शे.
9 जरी आम्हीन अस बोलतस तरी, प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुमनी स्थिती यानापेक्षा चांगली अनी तारणकडे लई जाणारी शे असा आमले तुमनाबद्दल भरवसा शे 10 कारण तुमना कार्य अनी तुम्हीन देवना लोकसनी करेल अनी करी राहिनात ती सेवा, यावरतीन जी प्रिती तुम्हीन त्याना नाववर दखाडेल शे, ती बी देवनी ईसरी जावं इतला तो अन्यायी नही. 11 आमनी अशी आशा शे की, तुमनापैकी प्रत्येकनी आशानी पुरी खात्री करी लेवाकरता तशीच उत्सुकता शेवटपावत धरी ठेवानी. 12 म्हणजे तुम्हीन आळशी व्हणार नहीत, पण त्यासनंमायक व्हवानं ज्या ईश्वासतीन अनं धीरतीन देवना वचनसले स्विकारतस, त्यासनामायक व्हा.
Languages