1 प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यसपैकी लेयल शे म्हणीसन देवन्या गोष्टीबद्दल तो मनुष्यसकरता नेमेल ऱ्हास, यानाकरता की त्यानी पापसबद्दल दानं अनं यज्ञपशुनं अर्पण करानं. 2 अज्ञानी अनी भटकेल लोकससंगे तो सौम्यतातीन वागणारा ऱ्हास, कारण तो बी स्वतः बराच गोष्टीसमा अशक्त ऱ्हास. 3 अनी या अशक्तपणमुये त्यानी जस लोकसकरता तसं स्वतःकरता बी पापसबद्दल अर्पण कराले पाहिजे. 4 हाई पदवी कोणी स्वतःव्हईसन निवडी लेस नही, तर अहरोनना मायक देवनी ज्याले पाचारण करेल शे त्याले भेटस. 5 असच ख्रिस्तनी बी प्रमुख याजक व्हवाकरता स्वतःना गौरव करी लिधा नही, तर देवनी त्याले सांगं की;
7 [a]तो पृथ्वीवर जिवत व्हता तवय, स्वतःले मरणपाईन वाचाडाकरता, जो समर्थ शे त्यानाकडे मोठा आक्रोश करीसन अनं आश्रु गाळीसन प्रार्थना अनं ईनंती करी, अनी ती त्याना भक्तीमुये अनं नम्रतेमुये ऐकामा वनी. 8 तरी तो देवना पोऱ्या असतांना बी दुःख सहन करीसन आज्ञापालन करानं शिकना. 9 अनी स्वतःले परिपुर्ण करीसन तो, आपली आज्ञामा राहणारा सर्वासना युगानुयुगना उध्दारना कर्ता व्हयना. 10 त्याले “मलकीसदेकना संप्रदायनामायक” प्रमुख याजक अस नाव देवकडतीन देवामा वनं.
Languages