5 इसहाक आपला पोऱ्या एसाव यानासंगे बोली राहिंता तवय रिबका ऐकी राहिंती, मंग एसाव शिकार कराले रानमा गया. 6 इकडे रिबका आपला पोऱ्या याकोब याले बोलनी, दख, मी तुना बापले तुना भाऊ एसावसंगे अश बोलतांना ऐकं की, 7 शिकार करीसन स्वादिष्ट भोजन तयार करीसन आण, म्हणजे मी ते खाईन मराना पहिले तुले परमेश्वरना समक्ष तुले आशिर्वाद दिसु. 8 तर मना बाळा, आते मी तुले सांगस ते ऐक; मना सांगानाप्रमाणे कर. 9 आत्तेनी आत्ते कळपमा जाय अनी त्यामाईन बकरीना दोनली बच्चा लई ये; म्हणजे मी त्यासनं तुना बापनं आवडतं स्वादिष्ट जेवण बनाडसु. 10 मंग ते तुना बापले लई जाय, म्हणजे तो ते जेवण खाईन मराना पहिले तुले आशिर्वाद दि. 11 यावर याकोब त्यानी माय रिबकाले बोलना, दख, मना भाऊ एसाव केसाळ माणुस शे, अनी मी तर बिगर केसना माणुस शे. 12 मना बाप माले कदाचित चापलीसनं दखी अनी मी त्याले फसाडी राहिनु शे अस त्याले दिसी मंग आशिर्वादना बद्लामा मी मनावर शाप लई ईसु. 13 त्यानी माय त्याले बोलनी, मना बाळा, तुले शाप भेटना तर तो माले लागो; पण मना एवढं सांगनं ऐक अनं बकरीनं पिल्लासले ली ये. 14 तवय त्यानी जाईसन ते आपली मायनाजोडे आणं अनी तिनी त्याना बापना आवडीना भोजन बनाडं. 15 मंग रिबकानी आपला मोठा पोऱ्या एसावना उत्तम वस्त्र लिसन ज्या त्याना घरमा व्हतात, आपला धाकला पोऱ्या याकोब याले घालात. 16 तिनी त्याना हातले अनं मानना गुळगुळीत भागले पिल्लासनी कातडी चिटकाडी दिधी. 17 अनी आपला हातघाई बनाडेल स्वादिष्ट भोजन अनं भाकर आपला पोऱ्या याकोब याना हातमा दिधं.
18 तवय याकोब आपला बापनाजोडे जाईसन बोलना, बाबा, तवय इसहाक बोलना, मी आठे शे? मना बाळा तू कोण शे? 19 तवय याकोब त्याना बापले बोलना, मी तुमना मोठा पोऱ्या एसाव शे? जस तुम्हीन माले सांगेल व्हत, तसच मी करेल शे, तर उठीन बसा अनी मास आणेल शे, एवढं खा; अनी तुम्हीन माले आशिर्वाद द्या. 20 तवय इसहाक आपला पोऱ्याले बोलना, मना बाळा तुले शिकार इतलं लवकर कश भेटनं? तो बोलना, आपला देव यहोवा यानी माले ते लवकर मिळु दिधं. 21 मंग इसहाक याकोबले बोलना, मना बाळा, तू मनाजोडे ये; तू मना पोऱ्या एसावच शे की नही हाई माले चापलीसनं दखु दे. 22 तवय याकोब आपला बाप इसहाकनाजोडे गया; तो चापलीसनं बोलना, आवाज तर याकोबना शे पण हात तर एसावना शेतस. 23 त्याना हात त्याना भाऊ एसाव याना हातनासारखा केसाळ व्हतात म्हणीन त्यानी त्याले वळख नही अनी त्याले आशिर्वाद दिधा. 24 तो त्याले बोलना, तू मना पोऱ्या एसावच शे ना? तो बोलना, हा, मी तोच शे. 25 तवय त्यानी सांगं, भोजन मनजोडे लई ये; मी मना पोऱ्यानाद्वारा करेल शिकारना मास खासु मंग मी तुले आशिर्वाद दिसु. याकोबनी जेवण त्यानाजोडे आणं अनी त्यानी ते खादं, त्यानी त्यानाकरता द्राक्षरस बी आणा अनी त्यानी ते पिदं. 26 मंग त्याना बाप इसहाक त्याले बोलना, "हे मना पोऱ्या जरासा जोडे ईसन मना मुका ले." 27 त्यानी जोडे जाईन त्याना मुका लिधात; तवय त्याना वस्त्रना वास लिसन असा आशिर्वाद दिधा, "मना पोऱ्याना सुगंध त्या शेतना सुगंधनामायक शे, ज्याले परमेश्वरनी आशिर्वाद देयल शे. 28 देव तुले आकाशतीन ओस अनी पृथ्वीवरनी सुपीक जमीनी अनी विपुल धान्य अनं द्राक्षरस देवो; 29 [a] राज्य राज्यना लोके तुनी सेवा करोत; अनी वंशना लोके तुले नमन करोत; तू आपला भाऊबंदसना मालक हो; मायना पोऱ्या तुले नमन करोत; जो तुले शाप दि त्या सर्वा शापीत व्हवोत; अनी जो तुले आशिर्वाद दि त्या सर्वा आशिर्वादीत व्हवोत."
39 तवय त्याना बाप इसहाक त्याले बोलना, दख, पृथ्वीवरनी सुपीक जमीनपाईन दूरतीन आकाशमाईन दव पडस तठेन दूर तुनी वस्ती व्हई; 40 [c]तू आपली तलवारघाई जगशी, अनं आपला भाऊसना नोकर व्हसी, तरी अश व्हई की, जवय तू निराश व्हसी तवय आपला खांदावरना त्याना जु तोडी टाकशी.
41 याकोबले आपला बापनी आशिर्वाद दिधा त्यामुये एसावनी त्यानासंगे वैर धरं; एसावनी आपला मनमा सांगं, मना बापनं मरणनं दिन जोडे येल शे, त्यानानंतर मी आपला भाऊ याकोबले मारी टाकसु. 42 आपला मोठा पोऱ्या एसाव यानं म्हणनं रिबकाले सांगाम वनं, तवय तिनी आपला धाकला पोऱ्या याकोब याले बलाईसन सांगं, दख, तुले मारी टाकना बेत करीसन तुना भाऊ एसाव आपला समाधान करी ली राहिना शे. 43 तर मना बाळा, आते मना ऐक: ऊठ, हारान आठे मना भाऊ लाबान शे, त्यानाकडे पळी जाय, 44 अनी तुना भाऊना तुनावरना राग जास तोपावत थोडा दिन त्यानाजोडे राय.
46 "तवय रिबका इसहाकले बोलनी, या हेथीसन्या पोरीमुये माले मना जीव नको व्हई राहिना शे, जर याकोब बी त्या देशमाधल्या पोरीमाईन एकादी हेथी पोरनासंगे लगीन करी लिधं, तर मना जगीन काय फायदा शे?"
<- उत्पती 26उत्पती 28 ->
Languages