1 तुमी चिठ्ठया टाकीसनं वतनकरता देशनी वाटनी करशात तवय परमेश्वरकरता समर्पित अंश अर्पन करानं; जमीनना एक वाटा पवित्र म्हनीसनं येगळा काढी ठेवानं; त्यानी लांबी पंचवीस हजार हात अनी रुंदी ईस हजार हात राहावाले पाहिजे; हाई बठी जागा चारीमेरतीन पवित्र ठेवानं. 2 यानामाईन पाचशे हात लांब अनी पाचशे हात रुंद एवढी समचौरस जागा पवित्रस्थानकरता ठेयीसनं तिना आजुबाजूले पन्नास हात मोकळी जागा राखी ठेवानी; ती चारीमेरतीन समचौरस राहावाले पाहिजे. 3 ती मोजेल जमीनमाईन तु पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद मोजी काढ; हाई जागवर पवित्रस्थान व्हयी; ते परमपवित्र शे. 4 हाई क्षेत्र पवित्र राहावाले पाहिजे; सेवा कराले परमेश्वरनाजोडे जानारा पवित्र स्थानना सेवकसकरता मनजे याजकसकरता ते राहावाले पाहिजे; तठे त्यासना घरकरता अनी पवित्तस्थानकरता पवित्र जागा राहावाले पाहिजे. 5 पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद एवढी जागा मंदीरनी सेवा चाकरी करनारा लेवीसनी राहावाले पाहिजे; वस्तीकरता त्यासना हाई वतन शे.
6 समर्पित अंश म्हनीसनं जी जागा येगळी ठेवानी शे तिले लागीसनं पाच हजार हात रुंद अनी पंचवीस हजार हात लांब एवढी जमीन नगरले वतन म्हनीसनं देवानं; हाई बठी इस्त्राएल घराणानी व्हवाले पाहीजे.
प्रधानकरता भुमी
7 समर्पित अंश म्हनीसनं ठेयेल भाग अनी नगरले देयेल भाग यासले लागीसनं दोनी बाजुकडली मनजे पश्चिमकडली अनी पुर्वकडली जागा अधिपतीले देवानी; पश्चिम सीमापाईन पुर्व सीमापावोत तिनी लांबी इस्राएल वंशले वाटी देयेल भागनी लांबीनीएवढी राहावाले पाहिजे. 8 हाई जमीन इस्त्राएलमां अधिपतीनी व्हवाले पाहिजे; मनजे यानामोरे मना अधिपतीसनी मना लोकेसवर जुलूम करानं नही; तर इस्राएली घराणामासली येग येगळा वंशले देयेल जमीन ज्यानी त्यानीकडे राहू देवानं.
21[f] पहिला महीनामां, महीनाना चौथा दिनले तुमले सात दिन वल्हांडण सण व्हयी, त्यामां बेखमीर भाकर खावानी, 22 त्या दिन अधिपती आपलाकरता अनी देशमासला बठा लोकेसकरता पापर्पण कराकरता एक वासरू सिध्द करी. 23 परमेश्वरले होमार्पण कराकरता सणना सात दिन त्यानी सात निर्दोष वासरू अनी सात मेंढरा सिध्द करानं अनी पापार्पण कराकरता रोज एक बोकड सिध्द करानं. 24 मंग अधिपती एक वासरुकरता एफाभर अनी एक मेंढरुकरता एफाभर अन्नार्पण अनी एफाकरता हिनभर तेल सिध्द करी, पापार्पण म्हनीसनं वासरू दी.
25 “सातवा महीनामां, पंधरावा दिनले सणमां, सात दिनपावोत तो पापबली, होमबली, अन्नबली अनी तेल हया यापरमानं सिध्द करी.”