6 "त्या फितुरी इस्राएल घराणाले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, इस्राएल वंशसवन; तुमी हाई बठ अमंगळ कृत्य करात ते आते बसं व्हयनं; 7 तुमी माले अन्न, चरबी अनी रंगत अर्पन करतसं तवय मनतीन अनी शरीरतीन बेसुंती आशे परका लोकेसले मना पवित्रस्थानमां आणीसनं मनं मंदीर भ्रष्ट करेल शे; हाई परकारतीन तुमी मना करार मोडीसनं आपला बठा अमंगळ कृत्यासमां भर घालेल शे. 8 तुमी मन्या पवित्र वस्तुसनी राखन करात नही; तर तुमी पवित्रस्थानमां तुमी सोता ऐवजी त्यासले मन्या पवित्र वस्तुना राखनदार नेमं.
9 प्रभु परमेश्वर म्हनसं, इस्राएल वंशमा राहानारा, मनतीन अनी शरीरतीन बेसुंती ज्या परदेशीसमाईन कोनी मना पवित्रस्थानमां येवानं काम नही.
20 त्यासनी आपला डोका काढानं नही; नहीते केस लांब वाढावानं नही तर त्यासनी आपला डोकानं केस कापानं. 21 [c] मजारना आंगणमां जावानी येयले कोनताच याजकनी द्राक्षरस पेवानं नही. 22 [d]त्यासनी ईधवासनीसंगे नहिते सोडेल बाईनीसंगे लगीन करानं नही, तर इस्त्राएली वंशमासली कुमारीनीसंगे एखादा याजकनी ईधवानीसंगे लगीन करानं.
23 त्यासनी मना लोकेसले शिक्षण देवानं, पवित्र काय अनी सामान्य काय शुध्द काय अनी अशुध्द काय यासमासला भेद त्यासले दखाडी देवानं. 24 झगडाखोरसना निवाडा कराले त्यासनी कायम तत्पर राहावानं; मना निर्णयपरमानं हाऊ निवाडा त्यासनी करानं; बठा सणासमां मना धर्मशास्र अनी नियम पायानं अनी मना शब्बाथनं पवित्रतीन पालन करानं.
25 त्यासनी प्रेतले हात लायीसनं अशुध्द व्हवानं नही; पन माय, बाप, पोर्या, पोर, भाऊ अनी कुवारी बहीन यासना बारामां त्या अशुध्द व्हयनाते चाली. 26 तो शुध्द व्हवावर आजुन सात दिन मोजानं. 27 मंग तो पवित्रस्थानमां, मनजे मजारना आंगणमां, पवित्रस्थानमासली सेवा कराले जायी त्या दिन त्यानी आपल पापार्पण करानं: आशे प्रभु परमेश्वर सांगस.
28 [e]त्यासले वतन काय म्हनशात तर मी त्यासनं वतन शे; त्यासले इस्त्राएलमां वाटा देवानं नही; त्यासना वाटा मी शे. 29 अन्नार्पण, पापार्पण अनी दोषार्पण हाई त्यासनी खावानं; इस्त्राएलनी वाहेल परतेक गोष्ट त्यासनी व्हवाले पाहिजे. 30 बठा पहिला फळना भाग, समर्पित अंश म्हनीसनं अर्पन करानी परतेक वस्तु याजकनी व्हवाले पाहिजे; तुमी तिंबेल कणिकना एक पहिला गोया याजकले देवानं मनजे तुमना घरले बरकत राही. 31 [f]कोनतबी त्याना मरेल नहीते टाकेल जनावर याजकनी खावानं नही; मंग तो चिडा राहो की पशू राहो.
<- यहेज्केल 43यहेज्केल 45 ->
Languages