1 तवय पौल बोलना, “हे मना यहूदी भाऊसवन अनी वडील मंडळीसवन, मी जे आते तुमले उत्तर देस ते तुम्हीन ऐका” 2 तो आपलासंगे इब्री भाषामा बोली राहीना हाई ऐकीसन त्या गप्पच व्हयनात, मंग त्यानी सांगं,
3 [a]मी यहूदी शे अनी किलिकिया प्रदेशना तार्स शहरमा मना जन्म व्हयना अनी या यरूशलेममा गमलियेलना चरणसमा धाकलाना मोठा व्हयनु, वाडवडीलसना नियमशास्त्रना कडकडीत शिक्षण माले भेटनं अनी जसा तुम्हीन सर्व आज देवबद्दल उत्साहीत शेतस तसा मी बी व्हतु; 4 [b]माणसे अनी बाया यासले बांधीन कैदखानामा टाकीन, त्यासले मारी टाकं तरी बी हाई वाटवर चालनारा लोकसना मी पाठलाग करा. 5 यानाबद्दल मुख्य याजक अनी सर्व वडील लोके मना साक्षीदार शेतस, त्यासनाकडतीन यहूदी भाऊसकरता मी दिमिष्क शहरले पत्र ली जाई राहींतु, यानाकरता की, ज्या या वाटवर चालणारा लोके तठे व्हतात त्यासले बी बांधीन यरूशलेममा आणीसन शिक्षा करानी.
6 मंग अस व्हयनं की, जाता जाता मी दिमिष्क शहरना जोडे पोहचनु तवय जवळजवळ दुपारना येळले आकाशमाईन मोठा प्रकाश मना आजुबाजू अचानक चमकना. 7 तवय मी जमीनवर पडनु अनी शौल, शौल! मना छळ का बरं करस? अशी वाणी मनासंगे बोलतांना मी ऐकी. 8 मी ईचारं, प्रभु तु कोण शे? त्यानी माले सांगं, ज्या नासोरी येशुना तु छळ करस, तोच मी शे. 9 तवय मनासंगे ज्या व्हतात त्यासनी प्रकाश दखा खरा, पण मनासंगे बोलणारी वाणी त्यासनी ऐकी नही. 10 मंग मी बोलनु, प्रभुजी, मी काय करू? प्रभुनी माले सांगं, ऊठीसन दिमिष्क शहरमा जा; मंग तुले जे जे करनं शे हाई ठरावामा येल शे, ते सर्व तठे तुले सांगामा ई. 11 त्या प्रकाशना तेजमुये माले दखाई नही राहींतात म्हणीसन मना सोबतीसनी मना हात धरीन माले दिमिष्कमा लई गयात.
12 मंग हनन्या नावना एक माणुस व्हता, तो नियमशास्त्रप्रमाणे न्यायी अनी तठे राहणारा सर्व यहूदीसकडतीन नाव कमाडेल माणुस व्हता. 13 तो मनाजोडे ईसन उभा राहीना अनी बोलना, शौल भाऊ, वर दख, तवय लगेच मी त्यानाकडे वर दखं. 14 मंग तो बोलना, आपला पुर्वजसना देवनी तुनाबद्दल ठरायेल शे की, तु त्यानी ईच्छा काय शे हाई समजी लेवानं, त्या नितीमान माणुसले दखानं अनी त्यानी तोंडनी वाणी ऐकानी, 15 कारण जे तु दखं अनी ऐकं त्यानाबद्दल तु सर्व लोकसपुढे त्याना साक्षीदार व्हशी. 16 तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
22 या वाक्यपावत लोकसनी त्यानं ऐकं, मंग त्या वरडीसन बोलनात, “असाले मारी टाका, याले जगामाईनच काढा, हाऊ जिवत राहवाना योग्य नही.” 23 त्या वरडी राहींतात अनी आपला कपडा आंगवरतीन काढीन फेकी राहींतात अनी धुळ उधळी राहींतात. 24 तवय सेनापतीनी असा आदेश दिधा की, पौलले छावणीमा आणा, यहूदी त्यानावर इतला का बरं वरडनात हाई समजाले पाहिजे म्हणीसन त्यानी चाबुकना फटका दिसन त्यानी चौकशी कराकरता सांगं. 25 मंग त्यासनी त्याले चामडाना दोऱ्यासघाई बांधं, तवय एक सेनापती त्यानाजोडे उभा व्हता पौल त्याले बोलना, “रोमी माणुसले, अनी ज्यामा त्याले अन्यायी ठराय नही, तरी असा माणुसले, फटाका मारानं हाई तुमनाकरता कायदेशीर शे का?”
26 हाई ऐकीसन अधिकाऱ्यानी सेनापतीकडे जाईसन सांगं, “आपण हाई काय करी राहीनुत, तो माणुस रोमी शे.”
27 तवय सेनापती त्यानाजोडे ईसन बोलना, तु रोमी शे का? माले सांगं,
28 सेनापतीनी उत्तर दिधं, “मी हाऊ नागरीकपणना हक्क बराच मोल दिसन ईकत लेयल शे.” पौलनी उत्तर दिधं, “मी तर जन्मपाईनच रोमी शे.”
29 यावरतीन त्यानी ज्या चौकशी करनारा व्हतात त्या लगेच त्यानापाईन निंघी गयात, शिवाय हाऊ रोमी नागरिक शे अस सेनापतीले समजनं तवय त्याले बी भिती वाटनी, कारण त्यानी त्याले कैदी बनाडेल व्हतं.
Languages