15 काही दिन तठे रावानंतर आम्हीन आपली तयारी करीसन यरूशलेममा गवुत. 16 आमनासंगे कैसरिया शहरमातला बराच शिष्य वनात, त्यासनी आपलासंगे सायप्रस शहरना म्नासोन नावना या जुना शिष्यले लई वनात, त्यासना घर आमले मुक्काम ऱ्हावानं व्हतं.
पौल याकोबले भेटस
17 यरूशलेमले येवानंतर ईश्वासु बंधुजणसनी आमनं आनंदमा आगतस्वागत करं. 18 मंग दुसरा दिन पौल आमनासंगे याकोबले भेटाले त्याना घर वना, अनी सर्व वडीलवर्ग बी तठे वना. 19 तवय त्यानी त्यासले भेटीसन आपली सेवामातीन ज्या कामे देवनी गैरयहूदी लोकसमा करात त्या एक एक करीसन सविस्तर सांग्यात. 20 हाई ऐकीसन त्यासनी देवनं गौरव करं, अनी त्याले सांगं, “हे भाऊ पौल, ज्यासनी ईश्वास ठेवा असा यहूदी लोकसमा कितला हजारो लोके शेतस, हाई तु दखस, त्या सर्व नियमशास्त्रना स्वाभिमान बाळगनारा शेतस. 21 तुनाबद्दल त्यासले अस सांगामा येल शे की, तु गैरयहूदी लोकसमा राहणारा सर्व यहूदी लोकसले मोशेना नियमशास्त्रना त्याग कराले शिकाडस अनी आपला पोरसनी सुंता करानी नही अनी रोजना परीपाठप्रमाणे चालानं नही, अस बी सांगस. 22 तर आते काय करानं? तु येल शे, हाई तर त्यासले कुठेन तरी माहीतच पडी. 23 यामुये आम्हीन तुले जे सांगतस ते कर, नवस करेल असा आमनामा चारजण शेतस. 24 त्यासले लिसन तु त्यासनासंगे शुध्द व्हवाना कार्यक्रममा सामील व्हय, अनी त्यासनी मुंडन कराले पाहिजे म्हणीसन त्यासना खर्च तु कर, म्हणजे तुनाबद्दल जे सांगामा येल शे, त्यामा काहीच अर्थ नही शे उलट तु स्वतः नियमशास्त्र पाळीन व्यवस्थानुसार वागस हाई सर्वासले समजी. 25[c]पण ज्यासनी ईश्वास ठेयल शे असा गैरयहूदी लोकसबद्दल आम्हीन निर्णय लिसन लिखीन धाडेल शे की, त्यासनी मुर्तिले अर्पण करेल पदार्थ, रक्त, गळा दाबीन मारेल प्राणी अनी व्यभिचार यापाईन स्वतःले संभाळानं.”
26 तवय पौल त्या माणससले लिसन दुसरा दिन त्यासनासंगे शुध्द व्हईसन मंदिरमा गया अनी ज्या दिनले त्यासनामझारना एक एक करता अर्पण करानं सुरू व्हयनं ते अर्पणे संपाना दिनपावत शुध्दताना दिन आपण पुरा करी राहिनुत अस त्यानी दखाडं.
मंदिरमा पौलले अटक व्हस
27 पुढे त्या सात दिन पुरा व्हणारच व्हतात, तवय आशिया प्रांतना यहूदी लोकसनी त्याले मंदिरमा दखीन सर्व लोकसनी गर्दीले भडकाई दिधं अनी पौलले धरी लिधं. 28 अनी वरडीन बोलनात, “अहो इस्त्राएल लोकसवन, आमले मदत करा! आपला लोके, मोशेनं नियमशास्त्र अनी हाई मंदिर यासना विरोधमा जो सर्वीकडे सर्वासले शिकाडस तो हाऊच शे, आखो यानी गैरयहूदी लोकसले या मंदिरमा आणीन हाई पवित्रस्थानले अपवित्र करी टाकेल शे!” 29[d]यासनी इफिस शहरना राहणारा त्रफिम नावना माणुसले पहिले पौलसंगे दखेल व्हतं, त्याले यानी मंदिरमा आनं व्हई, अस त्यासले वाटनं व्हतं.
30 सर्व शहर भडकी ऊठनं अनी सर्व लोके पयत ईसन एकत्र व्हयनात, अनी त्यासनी पौलले धरीसन मंदिरमातीन वढीन बाहेर काढं, अनी लगेच मंदिरना दरवाजा बंद करी दिधात. 31 मंग त्या जवय त्याले मारी टाकाले दखी राहींतात तवय रोमी पलटनना सेनापतीले बातमी लागनी की, सर्व यरूशलेममा गडबड व्हई जायेल शे. 32 तवय लगेच तो शिपाई अनी अधिकारीसले लिसन त्यासनाकडे खाल पयत गया, सेनापती, शिपाई अनी अधिकारी यासले दखीन त्यासनी पौलले मारानं थांबाडं. 33 तवय सेनापतीनी जोडे ईसन पौलले धरं अनी दोन साखळ्यासघाई त्याले बांधाना आदेश दिधा, मंग हाऊ कोण अनी यानी काय करं? अस त्यानी ईचारं. 34 तवय लोकसमातीन कोणी काय, तर कोणी काय काय वरडत राहीनात, त्या गोंधळमा त्याले नेमकं काय व्हयनं हाईच समजनं नही, म्हणीसन त्यानी त्याले किल्लामा लई जावाना आदेश दिधा. 35 त्या त्याले पायऱ्यासवर लई वनात तवय अस व्हयनं की, शिपाईसनी पौलले उचली लिधं अनी लई गयात कारण पुरी गर्दी भडकीच राहींती. 36 अनी लोकसनी गर्दी मांगे चाली राहींती, अनी “ह्याले मारी टाका!” अस वरडी राहींती.
पौल स्वतःना बचाव करस
37 मंग पौलले किल्लामा लई जाणार इतलामा त्यानी सेनापतीले सांगं की, “माले तुमनासंगे काही बोलानी संधी भेटी का?” तो बोलना, “ग्रीक भाषा तुले येस का? 38 ज्या मिसरी माणुसनी काही दिन पहिले बंड करीसन चार हजार बंडखोरसनं जंगलमा नेतृत्व करनारा, तो तुच शे ना?”
39 तवय पौलनी सांगं, “मी प्रसिध्द किलिकिया प्रदेशमाधलं तार्स शहरना यहूदी माणुस शे, मी तुमले ईनंती करस की, लोकससंगे बोलानी माले परवानगी द्या.”
40 त्यानी परवानगी देवानंतर पौलनी हातघाई लोकसले इशारा करा अनी सर्व शांत व्हवानंतर तो त्यासनासंगे इब्री भाषामा अस बोलना;