3 याहवेहच्या दूतासमोर उभ्या असलेल्या यहोशुआची वस्त्रे घाणेरडी होती. 4 तेव्हा तिथे उभे असलेल्यांना स्वर्गदूत म्हणाला, “त्याची घाणेरडी वस्त्रे काढा.”
5 मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा.” तेव्हा याहवेहचा स्वर्गदूत तिथे उभा असताना त्यांनी त्याच्या डोक्याला एक स्वच्छ फेटा बांधला व वस्त्रे चढविली.
6 नंतर याहवेहच्या दूताने यहोशुआवर ही जबाबदारी सोपविली: 7 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘जर तू आज्ञाधारकपणे माझ्या मार्गांनी चालशील, तर तू माझ्या भवनावर शासन करशील आणि माझ्या न्यायमंदिरावर अधिकार चालवशील. ते पवित्र ठेवावेस म्हणून मी ते तुझ्या ताब्यात देईन; आणि इथे उभे असलेल्यांच्या बरोबरीने तू स्थान ग्रहण करशील.
8 “ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे. 9 पाहा, मी यहोशुआसमोर एक दगड ठेवला आहे! या दगडाला सात नेत्र आहेत, मी त्यावर एक शिलालेख कोरणार आहे आणि या देशाची पापे एका दिवसात दूर करेन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
10 “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”
<- जखर्याह 2जखर्याह 4 ->- a सैतान अर्थात् शत्रू
Languages