5 रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.” 6 तेव्हा ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सर्वकाही तिला करावयास सांगितले होते तसे तिने केले.
7 जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली. 8 मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती!
9 त्याने विचारले, “तू कोण आहेस?”
10 “माझ्या मुली, याहवेह तुला आशीर्वाद देवो,” त्याने उत्तर दिले. “जो दयाळूपणा तू आता दाखविला, तो पूर्वी दाखविला त्यापेक्षा अधिक आहे: गरीब असो वा श्रीमंत, पण तू अशा तरुण पुरुषांच्या मागे गेली नाहीस. 11 आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस. 12 ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे. 13 आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”
14 म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “हे कोणालाही कळू देऊ नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”
15 तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला.
16 जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?”
18 तेव्हा नाओमी म्हणाली, “माझ्या मुली, काय घडते हे समजेपर्यंत वाट पाहा, कारण तो मनुष्य या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ राहणार नाही.”
<- रूथ 2रूथ 4 ->- a किंवा विसावा
Languages