Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 23
दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
2 ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,
ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.
3 ते माझा जीव ताजातवाना करतात.
ते आपल्या नावासाठी
मला नीतिमार्गाने चालवितात.
4 मृत्युछायेच्या दरीतूनही[a]
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
 
5 तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढता;
तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता;
माझा प्याला भरभरून वाहत आहे.
6 खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती
मजबरोबर आयुष्यभर असतील,
आणि मी याहवेहच्या,
घरात सदासर्वदा राहीन.

<- स्तोत्रसंहिता 22स्तोत्रसंहिता 24 ->