Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 15
दावीदाचे स्तोत्र.
1 याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल?
तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?
 
2 ज्याचे चालणे निर्दोष आहे,
जो धार्मिकतेचे आचरण करतो,
जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
3 जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही,
जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही,
आणि इतरांना काळिमा लावत नाही;
4 जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो,
याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो,
आणि जो स्वतःचे नुकसान होत असले
तरी दिलेले वचन पाळतो;
5 जो व्याज न आकारता पैसे उसने देतो;
जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही,
 
जो कोणी या गोष्टी करतो
तो कधीही ढळणार नाही.

<- स्तोत्रसंहिता 14स्तोत्रसंहिता 16 ->