Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 121
प्रवाशांचे आराधना गीत.
1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो—
मला साहाय्य कुठून येईल?
2 स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह,
तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.
 
3 ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत;
तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
4 खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत
किंवा डुलकीही घेत नाहीत.
 
5 याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात—
याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.
6 दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही,
आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.
 
7 याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील—
आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
8 तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे,
यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.

<- स्तोत्रसंहिता 120स्तोत्रसंहिता 122 ->