पौलाचे फिलेमोनला पत्र
12 तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे. 13 शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते. 14 परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे. 15 कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे. 16 परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.
17 यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर. 18 जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. 19 हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही. 20 बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर. 21 तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
22 आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
24 आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.
- a अनेसिम अर्थात् उपयुक्त
Languages