17 “ ‘दुसर्या दिवशी, बारा तरुण गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत. 18 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 19 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
20 “ ‘तिसर्या दिवशी अकरा गोर्हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत. 21 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 22 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
23 “ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. 24 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 25 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
26 “ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 27 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 28 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
29 “ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 30 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 31 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
32 “ ‘सातव्या दिवशी सात गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 33 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 34 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
35 “ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. 36 याहवेहसाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत. 37 गोर्हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 38 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
39 “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”
40 याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.
<- गणना 28गणना 30 ->
Languages