5 तेव्हा मोशेने त्यांचा वाद याहवेहपुढे आणला, 6 आणि याहवेह मोशेला म्हणाले, 7 “सलाफहादाच्या कन्या जे म्हणतात ते बरोबर आहे. तू खचितच त्यांना त्यांच्या पित्याच्या नातेवाईकामध्ये त्यांचा वाटा म्हणून द्यावे आणि त्यांच्या पित्याचे वतन त्यांना दे.
8 “इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. 9 आणि जर त्याला कन्या नसली, तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे. 10 आणि त्याला भाऊ नसला, तर त्याचे वतन त्याच्या पित्याच्या भावांना द्यावे. 11 जर त्याच्या पित्याला भाऊ नसले, तर त्याचे वतन त्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकाला द्यावे, म्हणजे ते त्याचे वतन होईल. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांस हा न्यायाचा नियम असावा.”
15 मोशे याहवेहला म्हणाला, 16 “याहवेह परमेश्वर, जे सर्व जीवधार्यांना श्वास देतात, त्यांनी या समाजावर कोणा एकाची नेमणूक करावी 17 की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.”
18 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “नूनाचा पुत्र यहोशुआ, ज्या पुरुषामध्ये पुढारीपणाचा आत्मा वसतो, त्याला घे व त्याच्यावर आपला हात ठेव. 19 एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर. 20 तुझे काही अधिकार त्याला दे म्हणजे सर्व इस्राएली समाज त्याचे आज्ञापालन करतील. 21 त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”
22 याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले. 23 आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली.
<- गणना 26गणना 28 ->
Languages