5 पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्र घेऊन आला. 6 त्या पत्रात असा मजकूर होता:
8 तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, “तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत.”
9 “यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते.
10 एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.”
11 पण मी म्हणालो, “माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? अथवा माझ्यासारख्याने स्वतःचा प्राण वाचविण्याकरिता मंदिरात लपून बसावे? मी मुळीच जाणार नाही!” 12 नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती. 13 मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांनी मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते.
17 तसेच, या दिवसात यहूदीयातील प्रतिष्ठित लोक तोबीयाहास बरीच पत्रे पाठवू लागले व तोबीयाकडून त्यांना उत्तर मिळत गेले. 18 यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता. 19 याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली.
<- नहेम्याह 5नहेम्याह 7 ->- a किंवा केफिरीम
Languages