4 मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.” 5 काही आजार्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. 6 त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले.
8 त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका. 9 जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका. 10 ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा. 11 एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”
12 त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला. 13 त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.
15 आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीयाह आहे.”
16 परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!”
17 कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता. 18 कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” 19 यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, 20 कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.
21 अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती[b] तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली. 22 त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले.
24 ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?”
25 घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.”
26 तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. 27 शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या मनुष्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला, 28 आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. 29 ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले.
32 त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले. 33 अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या आधी तिथे पोहोचले. 34 जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली.
35 दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे. 36 या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.”
37 यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
38 ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.”
39 मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. 40 त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. 41 मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. 42 ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, 43 आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या. 44 तिथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
47 रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. 48 तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले, 49 परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, 50 कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले.
53 ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली, 54 ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले; 55 लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले. 56 आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
<- मार्क 5मार्क 7 ->
Languages