7 “पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्या याजकाच्याच अधिकाराचा होईल. 8 जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल. 9 भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्या याजकाचे होईल, 10 अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”
12 “उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात. 13 उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे. 14 या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल. 15 उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
16 “परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्या दिवशी खाण्यास हरकत नाही. 17 अर्पणातील काही मांस तिसर्या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे. 18 शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.
19 “ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो. 20 परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे. 21 जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”
35 होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे. 36 कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा.
37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत. 38 याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.
<- लेवीय 6लेवीय 8 ->
Languages