यहोशुआ
7 “मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. 8 शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. 9 मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”
10 तेव्हा यहोशुआने तेथील लोकांच्या अधिकार्यांना हुकूम दिला: 11 “छावणीमधून जा आणि लोकांना सांगा, ‘तुमची अन्नसामुग्री तयार ठेवा. आतापासून तीन दिवसात तुम्ही येथून यार्देन नदी पार करून जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहेत, त्याचा ताबा घ्याल.’ ”
12 परंतु रऊबेन आणि गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला यहोशुआ म्हणाला, 13 “याहवेहचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवा, नंतर तो म्हणाला, ‘तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर हा प्रदेश तुम्हाला देतील.’ 14 तुमच्या स्त्रिया, तुमची लेकरे आणि गुरे मोशेने तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेकडे दिलेल्या प्रदेशात राहू शकतील, परंतु युद्धासाठी तयार असलेले तुमचे सर्व योद्धे इस्राएली लोकांच्या पुढे नदी पार करून जातील. तुम्ही त्यांना मदत करावी. 15 याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”
16 तेव्हा ते यहोशुआला म्हणाले, “जी आज्ञा तू आम्हाला दिली आहेस त्याप्रमाणे आम्ही करू आणि जिथे कुठे तू आम्हाला पाठवशील तिथे आम्ही जाऊ. 17 जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते. 18 जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!”
यहोशुआ 2 ->- a किंवा जे आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते
Languages