3 तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर[a] होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते. 4 जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.” 5 तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.
6 जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला. 7 त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली:
10 जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.
<- योनाह 2योनाह 4 ->- a फारच मोठे शहर मूळ भाषेत परमेश्वरासाठी एक महान शहर
Languages