1 पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला. 2 आणि याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आलास?”
3 तेव्हा याहवेहने त्याला विचारले, “मग माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही; तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा आणि वाईटापासून दूर राहणारा मनुष्य आहे. विनाकारण त्याचा नाश करण्यास जरी तू मला उत्तेजित केलेस, तरी त्याने त्याच्या प्रामाणिकतेला दृढ धरून ठेवले आहे.”
4 सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्याचे जे सर्वकाही आहे ते तो आपल्या स्वतःच्या जिवासाठी देईल. 5 परंतु आता, आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसाला लावून तर पाहा, म्हणजे तो खचितच तुमच्या तोंडावर तुम्हाला शाप देईल.”
6 त्यावर याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, तो तुझ्या हातात आहे; मात्र तू त्याचा जीव वाचू दे.”
7 मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले, 8 तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.
9 तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, “तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!”
10 यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख[a] स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?”
- a किंवा अनैतिक
Languages