4 येशू म्हणाले, “बाई,[a] तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही.”
5 त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”
6 त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.[b]
7 येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले.
8 नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.”
11 येशूंनी गालीलातील काना येथे केलेले हे पहिले चिन्ह होते व त्याद्वारे आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
12 यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम येथे राहण्यास गेले.
18 यहूदी पुढार्यांनी त्यांना म्हटले, “हे सर्व करण्याचा अधिकार आपणाला दिला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण कोणते चिन्ह आम्हास दाखवाल?”
19 येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”
20 त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?” 21 परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते. 22 पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला.
23 वल्हांडणाच्या उत्सवात येशू यरुशलेमात असताना, अनेक लोकांनी त्यांच्याद्वारे घडत असलेली चिन्हे पाहिली व त्यांच्या नावावर विश्वास ठेवला. 24 परंतु येशूंनी स्वतःस त्यांच्या अधीन केले नाही, कारण ते सर्व लोकांस ओळखून होते. 25 त्यांना मनुष्याविषयी कोणाच्याही साक्षीची गरज नव्हती, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे हे त्यांना माहीत होते.
<- योहान 1योहान 3 ->
Languages