4 मग पिलात पुन्हा एकदा बाहेर आला आणि तिथे जमलेल्या यहूद्यांना म्हणाला, “पाहा, मी आता त्याला तुमच्यापुढे बाहेर आणत आहे, परंतु लक्षात ठेवा की मला त्याच्या ठायी कोणताही अपराध सापडला नाही.” 5 येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!”
6 येशूंना पाहताच मुख्य याजक व त्यांचे अधिकारी ओरडू लागले, “क्रूसावर खिळा! क्रूसावर खिळा!”
7 तेव्हा यहूदी अधिकार्यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.”
8 हे ऐकल्यावर पिलात, अधिकच घाबरला. 9 आणि तो राजवाड्यामध्ये परत गेला. “तू कुठून आला आहेस?” त्याने येशूंना विचारले, परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले नाही. 10 पिलाताने म्हटले, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला सोडण्याचा अथवा तुला क्रूसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला कळत नाही का?”
11 तेव्हा येशू उत्तरले, “जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.”
12 तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”
13 हे ऐकल्यावर, पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला अरामी[a] भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो न्यायासनावर बसला 14 तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती.
15 पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!”
16 शेवटी पिलाताने येशूंना क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
19 पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते:
22 तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”
23 सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.
24 ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.”
25 क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. 26 मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई,[c] पाहा, हा तुझा पुत्र!” 27 आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
31 आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील. 32 त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्याचे ही मोडले. 33 परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत. 34 तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला. 35 ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की तो सत्य बोलत आहे आणि तो साक्ष देतो यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. 36 सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,”[d] 37 आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”[e]
Languages