5 माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का? 6 परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही? 7 ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का?
8 “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,”[a] हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता. 9 पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता. 10 जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्या एवढाच दोषी आहे. 11 ज्यांनी म्हटले, “तू व्यभिचार करू नको,”[b] तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.”[c] जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो.
12 स्वतंत्रता देणार्या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा, 13 कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.
18 पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.”
20 अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ[d] आहे याचा तुला पुरावा पाहिजे का? 21 आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का? 22 तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला. 23 आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,”[e] आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले. 24 तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.
25 त्याचप्रमाणे, राहाब वेश्याने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्या मार्गाने पाठवून दिले, यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का? 26 जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.
<- याकोब 1याकोब 3 ->
Languages