4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल. 5 द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे,
7 तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.
9 म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे. 10 आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.
11 वधलेल्या पशूंचे रक्त पापार्पण म्हणून महायाजक नियमानुसार परमपवित्रस्थानात नेत असत व नंतर त्या पशूंची शरीरे छावणीबाहेर जाळून टाकीत. 12 लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले. 13 तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या. 14 आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही.
15 तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या. 16 चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.
17 आपल्या पुढार्यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे. 19 तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.
Languages