6 “सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे. 7 मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 8 ‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. 9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.”
13 मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?”
14 नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात.
15 “ ‘आता तुम्ही आजपासून[a] गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती. 16 जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे. 17 तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात. 18 ‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा: 19 धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत.
23 “ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”
<- हाग्गय 1- a किंवा मागील दिवसांचा
Languages