6 साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.” 7 आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.”
11 ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती. 12 तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती[a] वाढेल. 13 त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
14 दुसर्या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.
15 जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले, 16 आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली.
17 मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे. 18 ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”
19 मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.
20 परमेश्वर त्या मुलासोबत होते. तो पारानच्या रानात लहानाचा मोठा होऊन एक तरबेज तिरंदाज झाला; 21 पुढे तो पारानच्या रानात राहत असताना त्याच्या आईने त्याचा इजिप्त देशातील एका मुलीसह विवाह करून दिला.
24 अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.”
25 “पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली. 26 “हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?”
27 मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला. 28 पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या, 29 तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”
30 यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”
31 म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा[b] पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.
32 बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले. 33 अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली. 34 आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.
<- उत्पत्ती 20उत्पत्ती 22 ->
Languages