6 ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही. 7 याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या[a] लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते. 8 कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते. 9 जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. 10 त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो.
14 जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?
15 “जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही. 16 हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने[c] नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.
17 “ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात?[d] नक्कीच नाही. 18 जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.
19 “नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. 20 मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. 21 मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”
<- गलातीकरांस 1गलातीकरांस 3 ->
Languages