1 नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात[a] होती. 2 प्रवेशद्वार दहा हात[b] रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात[c] होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद[d] होता.
3 मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात[e] रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात[f] होती. 4 आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.”
5 नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.[g] 6 बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या. 7 मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्या होत्या.
8 मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता. 9 बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंत पाच हात जाड होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या 10 आणि याजकांच्या खोल्यामधील मोकळ्या जागेचे माप मंदिराच्या सभोवती वीस हात रुंद होते. 11 त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता.
12 मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात[h] रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात[i] होती.
13 त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात[j] लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती. 14 मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती.
15 नंतर त्याने मंदिराच्या मागच्या बाजूच्या समोरच्या इमारतीची लांबी मापली, ती तिच्या दोन्ही बाजूंच्या सज्ज्यांसह शंभर हात होती.
21 मुख्य दिवाणखान्याला चौरस द्वारपट्टी होती आणि ती परमपवित्रस्थानाच्या द्वारपट्टीसारखीच होती. 22 तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात[k] उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.” 23 मुख्य दिवाणखाना आणि परमपवित्रस्थानाला दुहेरी दरवाजे होते. 24 प्रत्येक द्वाराला दोन झडपा होत्या; प्रत्येक द्वाराला बिजागरी लावलेल्या दोन झडपा होत्या. 25 मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या. 26 देवडीच्या बाजूच्या भिंतींवर अरुंद खिडक्या होत्या, ज्यावर प्रत्येक बाजूंनी खजुरीची झाडे कोरली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा लोंबत्या तुळया होत्या.
<- यहेज्केल 40यहेज्केल 42 ->
Languages