5 यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”
6 त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला. 7 पण जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने तसेच केले व इजिप्त देशात बेडूक आणले.
8 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”
9 मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”
10 फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.”
12 मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली. 13 मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले. 14 त्यांचे ढीग जमा झाले, व देशात त्यांची दुर्गंधी पसरली. 15 पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.
22 “पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे. 23 माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.”
24 आणि याहवेहने तसेच केले. आणि पाहा, फारोहचा राजवाडा, त्याच्या अधिकार्यांची घरे व इजिप्तच्या लोकांची सर्व घरे गोमाश्यांच्या दाट थव्यांनी भरून गेली; आणि गोमाश्यांनी देशाची नासाडी केली.
25 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”
26 पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय? 27 म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.”
28 फारोहने म्हटले, “तुमचा परमेश्वर याहवेह यास रानात जाऊन यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देतो, परंतु फार दूर जाऊ नका. आता माझ्यासाठी विनंती करा.”
29 मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”
30 मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली, 31 व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही. 32 परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.
<- निर्गम 7निर्गम 9 ->
Languages