7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. 8 यामुळे असे[a] म्हटले आहे:
14 आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्हेतर्हेच्या शिक्षणरूपी वार्याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये. 15 त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे. 16 त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते.
20 पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, 21 जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; 22 फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; 23 तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; 24 आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.
25 यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. 26 “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.”[c] तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. 27 आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका. 28 चोरी करणार्यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.
29 आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला. 30 परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात. 31 सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. 32 एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
<- इफिसकरांस 3इफिसकरांस 5 ->
Languages