6 परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” 7 मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले. 8 तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला. 9 सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले, 10 आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.
17 “आता, इस्राएली बंधूंनो, मला माहीत आहे की तुम्ही जे केले, ते अज्ञानाने केले आणि तुमच्या पुढार्यांनीही तेच केले. 18 परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले. 19 यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी, 20 आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे. 21 तरी ज्याविषयी फार पूर्वीपासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते की सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईपर्यंत, त्यांना स्वर्गामध्ये राहणे अगत्याचे आहे. 22 कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका. 23 जो कोणी संदेष्ट्याचे ऐकणार नाही, त्याचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.’[a]
24 “खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे. 25 तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’[b] 26 परमेश्वराने आपल्या सेवकाला उठविले, तेव्हा प्रथम तुमच्याकडे पाठविले, यासाठी की तुम्हा प्रत्येकाने तुमच्या दुष्ट मार्गापासून मागे वळून आशीर्वादित व्हावे.”
<- प्रेषित 2प्रेषित 4 ->
Languages