5 परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे[a] आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले. 6 पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत; 7 आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.” 8 शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली. 9 मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.
13 थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली. 14 विश्वासणार्यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले. 15 पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.
22 पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. 23 कारण मी बाहेर फिरत असताना, तुमच्या पूजेच्या वस्तूंकडे मी काळजीपूर्वक पाहिले, मला एक वेदीसुद्धा दिसून आली जिच्यावर असा शिलालेख होता:
24 “ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत; 25 मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात. 26 त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या. 27 परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत. 28 ‘कारण त्यांच्यामध्ये आपण जगतो, वागतो आणि आपले अस्तित्व आहे.’ प्रत्यक्ष तुमच्या कवींपैकी काहींनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण त्यांची संतती आहोत.’
29 “यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे. 30 पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे. 31 कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”
32 मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.” 33 त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला. 34 काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.
<- प्रेषित 16प्रेषित 18 ->- a किंवा लोकांच्या जमावाकडे
Languages