प्रेषितांची कृत्ये
6 मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?”
7 ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. 8 परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”
9 असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.
10 येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. 11 ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.”
15 त्या दिवसांमध्ये पेत्र विश्वासणार्या लोकांमध्ये उभा राहिला (ते एकूण एकशेवीस लोक होते) आणि त्याने भाषण दिले. 16 तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते. 17 तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.”
18 यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली. 19 ही वार्ता यरुशलेमात राहणार्या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले.
20 “यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे:
23 तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली. 24 नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा, 25 ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.” 26 नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.
प्रेषित 2 ->
Languages