5 मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? 6 आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. 7 कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. 8 मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील. 9 सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल, 10 आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला. 11 या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील, 12 आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.
15 बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण[c] आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.
16 ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त, 17 तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत.
<- 2 थेस्सलनीकाकरांस 12 थेस्सलनीकाकरांस 3 ->
Languages