2 तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.) 3 दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?”
4 गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.”
5 त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली, 6 तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.”
7 शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली. 8 परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल[a] हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लईचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले. 9 त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.
10 तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही. 11 अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, 12 दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.) 13 तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या.
14 त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.
18 कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले.
19 गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा[c] पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
20 आणखी दुसर्या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. 21 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले.
22 हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.
<- 2 शमुवेल 202 शमुवेल 22 ->
Languages