2 राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?”
3 तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?”
4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.”
9 तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”
10 परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”
11 तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. 12 मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”
13 दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता. 14 राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक थकलेले त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे त्याने विसावा घेतला.
17 अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”
18 हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार. 19 आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.”
20 अबशालोम अहीथोफेलला म्हणाला, “आम्हाला तुझा सल्ला दे, आम्ही काय करावे?”
21 अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.” 22 तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला.
23 त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत.
<- 2 शमुवेल 152 शमुवेल 17 ->
Languages