4 परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?”
5 मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”
6 मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.”
9 दुसर्या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले? 10 तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.” 11 असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.
12 यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला, 13 त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?”
14 तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही.
15 तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?”
17 जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.
20 येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली. 21 नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले. 22 आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले.
23 यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.” 24 म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”
25 येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्यात गेले. 26 बआलच्या मंदिरातून पवित्र स्तंभ बाहेर काढला आणि तो जाळून टाकला. 27 त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात.
28 याप्रमाणे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना नष्ट केली. 29 तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली.
30 याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.” 31 परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
32 त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला. 33 यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले.
34 येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय?
35 येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला. 36 येहूने इस्राएलाचा राजा म्हणून शोमरोनात अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
<- 2 राजे 92 राजे 11 ->
Languages