7 तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे. 8 आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. 9 छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही. 10 आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. 11 म्हणून आम्ही, जे जिवंत आहोत ते येशूंप्रीत्यर्थ मरणासाठी सोपवून दिलेले आहोत, यासाठी की आमच्या मर्त्य देहांमध्ये सुद्धा त्यांचे जीवन प्रकट व्हावे. 12 आमच्यामध्ये मृत्यू कार्य करतो, परंतु तुम्हामध्ये जीवन कार्य करते.
13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,”[b] त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा[c] आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो. 14 आम्हाला हे माहीत आहे की, ज्यांनी प्रभू येशूंना मेलेल्यांमधून जिवंत केले, तेच आम्हालाही येशूंबरोबर पुन्हा जिवंत करतील आणि तुमच्याबरोबरच आम्हाला स्वतःपुढे सादर करतील. 15 हे सर्व तुमच्या भल्यासाठी आहे, जितके अधिक लोक त्यांच्या कृपेने त्यांच्याजवळ येतील, तितके त्यांच्या अपार दयेबद्दल त्यांचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल.
16 यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. 18 म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.
<- 2 करिंथकरांस 32 करिंथकरांस 5 ->
Languages